सह्याद्रीचे दरी-खोरे, सातपुडा, दक्खन चे पठार, संपन्न समुद्र किनारा, यात वसतो आपला हा समृद्ध महाराष्ट्र देश. महाराष्ट्र म्हणजे संतांची कर्मभूमी...पुण्यभूमी!!! “ज्ञानदेवे रचिला पाया,तुका झालासे कळस!” हे पाहिलेली...अनुभवलेली पवित्र माती. ह्यां सर्व संतांची निस्वार्थ आणि निस्सीम भक्ती, त्यांची शिकवण आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा खरा अर्थ सांगते. ह्या महाराष्ट्राचा मातीने आपल्याला हि संत परंपरा दिली आणि संतांनी आयुष्यभर आपल्याला भरभरुन दिलं...!!! म्हणून… प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!
ह्या मातीने जशी भक्ती रुजवली, तशीच शक्ती सुद्धा वाढवली! परकीयांचे आक्रमण सोसले आणि मग ह्याच मातीने भक्ती आणि शक्ती ची सांगड घालून शिवाजी महाराजांना घडवले. त्यांनीच महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले, जनतेचे राजे होऊन गेले! शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला आई चं स्थान दिला आणि तिचा संरक्षणासाठी आयुष्यभर लढले. भक्ती आणि शक्ती दोघांची सांगड घालून पुढचा पिढीसाठी आदर्श ठेवला. महाराज फक्त इतिहासापुर्तेच नाही तर ते आपल्या संस्कृतीत रुजले....संस्कारात रुजले आणि ह्या मातीत आपल्या मतीत स्वाभिमान रुजवला!!! म्हणून... प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!
नंतरच्या काळात म्हणजेच १७व्या शतकात ब्रिटिशांनी आक्रमण केलं, तेव्हा महाराजांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ह्या मातीने शक्तीच्या रुपात अनेक देशभक्त घडविले. वासुदेव बळवंत फडके, तात्या टोपे,लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनोबा भावे, ज्योतिबा फुले ह्यांनी व ह्यांचा सारख्या अनेक जणांनी भारताच्या स्वातंत्र्यात मोलाचा वाटा उचलला. भारत मातेच्या रक्षणासाठी सरसावलेली हि वीर माती....म्हणून... प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!
स्वातंत्र्याचा आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा एक गोष्ट चिरंतर काळासाठी टिकणार आहे ती म्हणजे इथली परंपरा, इथली संस्कृती!! खरा तर कागदोपत्री महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झली; पण त्या आधी सुद्धा महाराष्ट्र होता, तिथली संस्कृती, तिथली परंपरा, तिथला इतिहास, तिथले संस्कार, तिथल्या लोकांनीच जपली, जोपासली! पश्चीमात्यकरणालाबरोबर घेऊन, संस्कृतीला न विसरता, अगदी सुंदर पद्धतीने त्यांची सांगड घातली! पेहराव, पाककृती, साहित्य, संगीत, ह्या आणि अशा कोणत्याही क्षेत्रात आपला महाराष्ट्र मागे राहिला नाहीये, आजच्या काळाचा खांद्याला खांदा लाऊन तो प्रगतीच्या पथावर चालत आहे. आणि हीच परंपरा, संस्कृती त्यांचा लिखाणाचा, संगीताचा, माध्यमातून अनेक वरिष्ठ आणि महान लेखकांनी, कवींनी, गीतकारांनी, जगापर्यंत पोहोचवली, दिली! दादासाहेब फाळके,लता मंगेशकर, रघुनाथ माशेलकर, सचिन तेंडूलकर,सुनील गावस्कर असे असंख्य रत्न ह्या भूमीने भारतालाच काय तर संपूर्ण जगाला दिले. म्हणून...प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!
आत्ताचा घडिला महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या भारतात पहिला आहे आणि हाच महाराष्ट्र भारताची ‘financial capital’ सुद्धा आहे. एवढच नाही तर भारतातली पहिली रेल्वे हि महाराष्ट्रातच सुरु झाही, मुंबई ते ठाणे. ह्या घटनेचा सुद्धा आपल्या आर्थिक प्रगतीत मोलाचा वाटा आहे! औद्योगिकदृष्ट्या सुद्धा भारतासाठी महाराष्ट्र श्रेयस्कर ठरला आहे! म्हणून...प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!
ह्या महाराष्ट्रातच विद्येच माहेरघर आहे. म्हणून उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी महाराष्ट्रला प्राधान्य देतात. फक्त शिक्षणच नाही तर इथे चांगल्या नोकरीसाठी, मुंबई मध्ये चित्रपट सृष्टीच्या आकर्षणामुळे, सोयीस्कर व्यवसायामुळे, व्यापारामुळे, इथल्या शांत राहिनिमानामुळे, इथे स्थाईक व्हायला प्राधान्य देतात. आणि आपला महाराशत्र त्यांना मोठ्या मानणे स्वीकारतो!! म्हणून...प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!
एकीकडे एलोरा, अजंटा, वेरूळ, विविध गड, किल्ले, तर एकीकडे वेगवेगळ्या रंगांने बहरलेला कास पठार; माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा सारखे निसर्गरम्य ठिकाणं, समृद्ध समुद्र किनारा, अशा असंख्य निसर्गचा छटा अनुभवणारा असा हा निसर्ग संपंन्न आपला महाराष्ट्र!! म्हणून... प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!
अशा ह्या महाराष्ट्राने आपल्याला सतत खुप प्रेम दिलं, खूप शिकवलं, घडवलं, एकत्र जोडून ठेवलं, आणि सह्याद्री सारखं अभेद्य बनवलं!! दोन्ही हातांनी मनापासून सगळं दिलं. खरोखरच आपलं राष्ट्र महानच आहे! असा हा आपला प्रदेश...प्राचीन काळातील दंडकारण्या पासून ते आत्ताच्या महाराष्ट्रा पर्यंतचा प्रवासात पाहिलेला आणि घडविलेला इतिहास, जो आपल्या वर्तमानातील साथ आहे आणि भविष्यातील आस आहे. भविष्यात सुद्धा ह्या मातीतून अनेक शास्त्रज्ञ, सैनिक, अधिकारी, खेळाडू, गायक, बाहेर पडून देशासाठी आपलं योगदान देतीलच....देशकार्यासाठी सदैव तत्पर असतीलच .....ती तर ह्या मातीची परंपराच!!!कारण....दिल्लीचेहि तख्त राखितो महाराष्ट्र माझा!! म्हणून... प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!
- Shatakshi Bhondwe
No comments:
Post a Comment