Saturday, April 24, 2021

जागतिक पुस्तक दिनानिमीत्त...!

जागतिक पुस्तक दिनानिमीत्त…! 

पुस्तकमित्रांच्या विरहाने व्याकुळ झालेल्या एका वाचकाची कळकळीची विनंती. 


     एक विनंती…! 


वेळेचं कारण देऊन पुस्तकांनो, 

गृहीतच धरलं ना मी तुम्हाला? 

अन् त्याचीच शिक्षा म्हणुन की काय, 

दुःसह विरह नशीबी आला!


तुम्ही तर आहात कायमच , 

मनाशी मी म्हणत होते, 

अन् आभासी जगाच्या मोहजालात

माझ्याही नकळत गुंतत होते!! 


सर्वांसारखा स्क्रीनचा मोह, 

होतच होता मला अनावर! 

मायावी पडद्याची फसवी जादू, 

झालीच होती मुग्ध मनावर!! 


वाटे चिमुकल्या पडद्यावर, 

सारे काही सामावते! 

अक्षरे दिसतातच त्यावर, 

कागदाची का गरज पडते? 


मग मात्र तुम्हीही मला, 

धडा शिकवायचा पण केलात 

अन् विषाणूच्या निमित्ताने, 

पडद्याआडच लुप्त झालात! 


अभ्यासक्रमाच्या ppts तर 

अवांतराच्या pdf, 

वाचनालयेही बंद का तर, 

Stay at home stay safe! 


नव्याच्या नवलाईनंतर

 माझेही डोळे थकू लागले, 

अन्  तुमच्या पानापानांमधल्या

 सच्चिदानंदाला मुकू लागले!! 


याच भरीला भर म्हणुन 

लेखणीही रुसली माझ्यावर 

मग मी पुरती समजून चुकले, 

तिची सारी भिस्त तुमच्यावर! 


वचन देते पुस्तकांनो

वाचकधर्माला मी जागेन, 

फावल्या वेळात स्क्रीन सोडून, 

एखादं छानसं पुस्तक मागेन! 


आता मात्र लवकरात लवकर, 

माझ्यातल्या 'मी' ला संजीवनी द्या! 

Pdf म्हणुन नाही, 

Hard copy म्हणुन माझ्या भेटीला या 

तुम्ही Hard copy म्हणुन माझ्या भेटीला या! 


©समृद्धी भालवणकर.( द्वितीय वर्ष कला शाखा )

वादसभा सदस्य

No comments:

Post a Comment

Polymers of Our Progress

On this auspicious occasion of World Environment Day, let’s take a moment to delve in one of the strangest “Evolutionary” headlines you coul...