Monday, April 22, 2024

पत्रास कारण की.....


' पत्रास कारण की ' या पुस्तकाचे लेखक - आदरणीय व सुप्रसिद्ध  'अरविंद जगताप ' आहेत. अरविंद जगताप  हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते विख्यात कवी, गीतकार आणि लेखक आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांचे कथालेखन केलेले आहे. त्यांच्या लेखनातून आपल्याला वास्तवाचे भान आढळते; रादर त्यांच्या लेखनातून सामाजिक समस्यांचे चित्रण होते. त्यांचे लेखन जणू समाजाचा एक आरसाच आहे. असं म्हणतात की 'चांगला वाचक चांगला लेखक होऊ शकतो!' अरविंद जगताप स्वतः एक चोखंदळ वाचक आहेत, हे त्यांनी लेखनात वापरलेल्या शब्द संपत्ती वरून दिसून येते.

'पत्रास कारण की....' हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध व रंजक पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे; रादर हे पुस्तक नसून मनुष्याच्या भावनांचा साठा शब्दांकित करून एकत्र मांडलेला आहे, असे मला वाटते. 'पत्रास कारण की.....' मध्ये अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या शेकडो पत्रांचा संग्रह आहे. यातील पत्रे शब्दालंकारांनी नटलेली आहेत. प्रत्येक पत्र 'जगावं कसं?' याची शिकवण देते. एक अन् एक पत्र हे परस्पर विरुद्ध असून वेगळा संदेश पोहोचवते. यातील खासियत ही की अरविंद जगताप यांनी प्रत्येक पत्र वेगळं पात्र समजून लिहिलेले आहे. त्यांनी एक लेखक म्हणून स्वतःला भिन्न-भिन्न पात्रांना समजून स्वतःला त्या पात्राच्या भूमिकेच्या अग्रस्थानी ठेवलेले आहे आणि मग पत्र लिहिलीत. यामुळे हा संग्रह वैविध्यपूर्ण होतो.अरविंद जगताप पात्र समजून पत्र लिहितात; यामुळे ती पत्र इतकी वास्तवदर्शी वाटतात की वाचकाला वाटते, जणू ही आपणच कुणासाठी तरी लिहितोय किंवा जणू आपल्या करताच कोणीतरी पत्र लिहिले. अबोल वाचकांना असे वाटते की आपल्या भावनांना शब्द फुटलेत आणि कुणीतरी आपल्या मनातील विचार कागदावर अंकित केलेले आहेत. त्यांची हीच 'पात्र बनून पत्र' लिहिण्याची तऱ्हा वाचकांना आवडते.

या पुस्तकातील प्रत्येक पत्र वाचायला आपण प्रेरित होतो; रादर अरविंद जगताप यांचे लेखन आपल्याला पत्र वाचाव यास भाग पाडते. प्रत्येक पत्र वाचल्यावर आपल्याला आयुष्याचा, समजाचा एक- एक पैलू उलगडत जातो. सगळीच पत्र आपल्या मनावर त्यांचा छाप उमटवतात. यातून अरविंद जगताप एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत याची जाणीव होते. एक अन् एक पत्र वाचल्यावर अरविंदजींना प्रत्येक विषयाबद्दल केवढं सखोल ज्ञान आहे आणि विविध माहिती आहे याची प्राप्ती होते. त्यांचे लेखन फक्त ललित व साहित्यिक या विषयांची निगडित नसून राजकीय, वैचारिक, भौगोलिक.... अशा असंख्य विषयांवर आधारित असते, यामुळे वाचकाचा सर्वांगीण विकास होतो व त्याचेही ज्ञान विस्तारित होते. त्यांचा हा पत्रांचा संग्रह वाचायला वयाचे बंधन नाही; किंबहुना हे वयाच्या चौकटीच्या पल्याड आहे. सीनियर सिटीजन, वर्किंग पोप्यूलेशन तसंच लहान/कुमारवयीन मुले देखील पत्र वाचू शकतात. ही पत्र वाचताना कोणीही इतका गुंतून जातं की त्यांना वेळेचा विसर पडतो. याचबरोबर पुस्तक बंद करताना वाचकाची अमूल्य भेट; त्याच्या डोळ्यातील पाणी पुस्तकात बंदिस्त होते, कोरले जाते.

- Aaryan Padhye

No comments:

Post a Comment

Because Every Life Is Precious...

I still remember that day and it shakes me to my core till date. That evening felt heavier than usual. That day when nothing made sense. I h...