१ ऑगस्ट एक अविस्मरणीय अनुभव
तारीख १२जुलै २०२१, वादसभेच्या नवनिर्वाचित सचिवांनी पहिली मीटिंग घेतली आणि १ऑगस्ट रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या टिळक स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. त्या क्षणापासून या कार्यक्रमाची उत्सुकता निर्माण झाली होती. याचे अतिशय प्रमुख कारण म्हणजे, मागील संपूर्ण वर्ष मग ते शैक्षणिक असो वा सांस्कृतिक हे ऑनलाईन पद्धतीने काढावं लागलं. त्यातही याच वर्षी जानेवारी महिन्यात डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच महाविद्यालयात आणि वादसभेत ऑफलाईन उपस्थित राहण्याची संधी मिळाली, तो अतिशय आनंददायी अनुभव हाताशी असल्यामुळे पुन्हा कधी महाविद्यालयात जायला मिळेल ह्या संधीची वाट बघत होतो, आणि या निमित्ताने ती संधी मिळेल हे कळताच उत्साह द्विगुणित झाला, व परीक्षा संपताच थेट पुण्यात आलो. नवीन सचिवांबरोबर असलेला हा पहिलाच कार्यक्रम म्हणून एक वेगळा आनंद होता. ज्यांच्या एक शब्दाखातर महाविद्यालयास हा प्रचंड आवार मिळाला असे लोकमान्य टिळक ह्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालय दरवर्षी हा लोकमान्य टिळक स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करतं , व त्याचबरोबर हा दिवस महाविद्यालयातील अभ्यासेत्तर उपक्रमांची नांदी म्हणून ओळखला जातो याची पूर्वकल्पना होती. त्यामुळेच उत्साहाबरोबर जबाबदारीची देखील जाणीव होती. प्रथमतः कार्यक्रम कोणत्या माध्यमातून होईल, कुठे आयोजित केला जाऊ शकतो, प्रमुख पाहुणे कोण असतील या सर्व गोष्टींपुढे एक मोठं प्रश्नचिन्ह होतं. कॉलेज मधील कार्यक्रमाच्या तयारी साठीचे पहिले दोन दिवस हे या सर्व गोष्टींची पुष्टी करण्यात गेले. पण दुसऱ्या दिवसा आखेर हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या मानाच्या अशा रमाबाई सभागृहात घेण्याची, व अंशतः ऑफलाईन पद्धतीने घेण्याची परवानगी मिळाली आणि कामांना वेग आला. पण ऑफलाईन कार्यक्रम हे एक वेगळं आव्हान होते. कारण वादसभेतील बहुतांश मुलांनी 1 ऑगस्ट चा ऑफलाईन कार्यक्रम पाहिला नव्हता, आणि कार्यक्रम एवढ्या मोठ्या सभागृहात सर्वांच्या नजरेत चांगला दिसेल का? आणि कोविडच्या नियमांचे पालन करून करायचा हे एक वेगळे दडपण होते. पण संघप्रमुख खंबीर असल्यावर प्रत्येकाला विश्वास वाटतो की आपण हे आव्हान सहज पार करू. त्याचप्रमाणे देवणे सर, अरुंधती मॅम, तसेच सचिव या सगळ्यांचा त्यांच्या Juniors आणि सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास होता म्हणून हे शक्य झाले.
तांत्रिक बाजूबद्दल बोलायचे तर कार्यक्रमाच्या आधीचे सात दिवस हे संपूर्ण Trial and error चे होते. सभागृहातील कार्यक्रम प्रेक्षकांसाठी ऑनलाईन दाखवण्याची सोय करणे हे प्रमुख उद्दिष्ट होतं. DSLR कॅमेरा वापरून कार्यक्रम stream करायची कल्पना असल्याने त्याचा सराव सुरू तर केला पण मी स्वतः या आधी कधीच कॅमेरा हाताळला नव्हता त्यामुळे या कार्यक्रमाची एवढी महत्वपूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे आणि हे आपण करू शकू की नाही अशी शंका येऊ लागली. पण, आपण आपले प्रयत्न शंभर टक्के करायचे परिणामांबाबत आत्ताच वाईट विचार करून काहीही साध्य होत नाही हा माजी सचिवांनी दिलेला कानमंत्र२ त्यावेळी कामी आला. त्याचबरोबर असेही लक्षात आले की आपल्याला बाहेरून कॅमेरा आणण्याची गरज आहे पण तो ही कॅमेरा जेव्हा सॉफ्टवेअरने डिटेक्ट केला नाही तेव्हा थोडीशी चिंता वाटू लागली करण सामग्रीसह पूर्ण तयारी होती. पण दृश्यच जर दिसले नाहीतर stream काय करणार. पण सिनिअर्स चा सल्ला घेऊन थोडी शोध मोहीम करत अशाप्रकारे २ दिवस आधी मार्ग निघाला आणि camcorder भाड्याने घेत कार्यक्रम लाईव्ह करायचं हे निश्चित झाले. आणि मग नव्याने उत्साह संचारला. या सर्व खटाटोपासाठी टेकनिकल टीम चं कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
पण हा सगळा कार्यक्रमाच्या पूर्वीचा आणि लांबचा भाग झाला. खरंच आव्हान कोणाला होते तर ते आपल्या स्टेज, हॉल आणि हॉस्पिटॅलिटी टीमला. कारण हा कार्यक्रम वादसभेला आयोजित करण्याची संधी मिळाली ती वादसभेच्या शिस्तीमुळे. तिच शिस्त, नीटनेटकेपणा हा याही कार्यक्रमात दाखवण्याची आणि हा कार्यक्रम रमाबाई सभागृहात आणि ऑफलाईन होण्यासाठी सचिव व वादसभाप्रमुखांनी घेतलेली मेहनत, या सगळ्यांचे चीज करण्याची जबाबदारी या कमिटींवर होती आणि ही जबाबदारी त्यांनी लीलया पेलली यात काहीच शंका नाही. उपस्थिती कितीही असली तरी आपले नियोजन आणि त्याची अंमलबजावणी ही चोखच असली पाहिजे हे तत्व हॉल कमिटीने पाळले आणि त्याप्रमाणे कोविड नियमांचे पालन करत क्रॉस मार्क्स लावणे असेल किंवा टेकनिकल कमिटी ला सहकार्य करत त्यांच्या गरजा पाहून त्याप्रमाणे काम करणे असेल आणि त्याहूनही पुढे आपले काम संपले म्हणून आयते न बसता मनुष्यबळाची कमी लक्षात घेत अतिशय नम्रपणे हॉल कमिटीच्या सदस्यांनी इतर कामात देखील हातभार लावला व तीही कामं उत्तम प्रकारे पार पाडली. स्टेज कमितीबद्दल जितके लिहावे तेवढे कमीच आहे; कारण कार्यक्रमाचा अतिशय महत्वाचा भाग हा या कमिटीच्या हाती होता. कारण इथे झालेल्या एका चुकीचे पडसाद संपूर्ण कार्यक्रमाच्या यशावर उमटले असते. पण सर्व ताण बाजूला ठेवत कार्यक्रमाच्या दोनच दिवस आधी येऊन देखील उत्कृष्ट नियोजन आणि एकमेकांशी असलेला उत्तम ताळमेळ ह्या जोरावर त्यांनी संपूर्ण स्टेज कार्यक्रमासाठी तयार केलाच पण कार्यक्रमाच्या रुपरेषेत आयत्यावेळी बदल होऊन देखील कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होऊ देता तीही परिस्थिती त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट अशी हॉस्पिटॅलिटी कमिटी. आलेले प्रमुख अतिथी, विशेष सन्मानार्थी आणि पाहुणे हे मोठी पदेभूषविलेले , आणि त्याहुनी महत्वाचे म्हणजे महाविद्यालयाचे आणि वादसभेचे माजी विद्यार्थी आहेत, म्हणूनच त्यांच्या मनात नियोजन , कामाचा उरक ह्या सर्व गोष्टी आजच्या वादसभेच्या विद्यार्थ्यांना बघताना असतील याची कल्पना असल्याने त्याचे थोडेसे दडपण या सर्वांच्या मनात असणे सहाजिकच होते . पण ह्या सर्व गोष्टी दुय्यम मानत अतिशय अगत्याने त्यांनी पाहुण्यांचं स्वागत व पाहुणचार केला व काही अडचणी आल्या असता प्रसंगावधान राखून त्या दूर केल्या . इतकंच नव्हे तर वादसभेतील प्रत्येक सदस्याला नाष्टा, किंवा जे काही हवं आहे ते वेळेत मिळतंय ना ह्याची सुद्धा खबरदारी त्यांनी घेतली. खरोखर हा कार्यक्रम फक्त कार्यक्रम नव्हता तर एक मोठी शिकवण होती , की गोष्टी यशस्वी करून दाखवायच्या असतील तर नुसता अनुभव गाठीशी असून चालत नाही , तर बदलत्या परिस्थितीबरोबर घेतलेले निर्णय देखील बदलावे लागतात , शंभर अडचणी , थोडे मतभेद , वाद , रुसवे फुगवे ह्या सगळ्यावर मात करत संघ म्हणून एकत्र येत एकमेकांवरचा विश्वास बळकट करत जर ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल केली तर यश नक्की मिळते , आणि हे आमचं यश म्हणजे सर्व मान्यवर , वादसभेचे सर्व आजी - माजी सदस्य , तसच सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व प्रेक्षकांकडून आलेली शाबासकीची थाप , आणि ही थाप एकट्या दुकट्या साठी नसून संपूर्ण वादसभेसाठी आहे . आणि म्हणूनच हा कार्यक्रम म्हणजे अशाच अनेक यशांची मग ते स्पर्धांमधून असो वा अशा उपक्रमांमधून सर्व प्रकारच्या प्रगतीची नांदी आहे असे मला वाटते. पुढे असे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम आयोजित होतीलच पण महामारीनंतरचा पहिला ऑफलाईन कार्यक्रम आणि पुनःश्च हरिओम म्हणत पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठीचा हा प्रयत्न म्हणून हा कार्यक्रम अविस्मरणीय आहे!
-वरद सहस्रबुद्धे
(वादसभा सदस्य)
Sundar
ReplyDeleteWoohhhh 🔥🔥💪
ReplyDeleteToo good. Kudos to our team 👍👍
ReplyDeleteKadak
ReplyDeleteKhup khup sundar Varad! Keep writing 👍👌
ReplyDeleteMasta. Keep it up 👌
ReplyDeleteThank you everyone
ReplyDeleteCongratulations to the entire team! The programme was planned and executed with utmost perfection. Glad that the legacy of offline programmes that showcases Vaadasabha's impeccable management will thrive again! Kudos to the entire team (especially the technical team). All of you did great!
ReplyDeleteThank you so much....means a lot♥️
DeleteThank you sachiv 🤗
ReplyDelete