नमस्कार!
सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा!
दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्व आजकाल अनन्यसाधारण झाले आहे. यांत्रिक उपकरणांचा वाढता वापर असेल किंवा संवाद साधण्याचा मूलभूत घटक असेल एकही क्षेत्र असे अस्तित्वात नाही ज्या मध्ये विज्ञान नाही.
आज २८ फेब्रुवारी भारतीय महान वैज्ञानिक डॉ. C.V. Raman यांचा जन्मदिवस. हा दिवस विज्ञान दिवस म्हणून मानला जातो.
Dr.C.V. Raman यांनी शोध लावलेल्या Raman effect बद्दल जाणतोच.
आपण मातीतल्या अणूपासून प्राणी, वनस्पती या सजीवांपासून आकाशगंगेतील ग्रह, ताऱ्यांपर्यंत ते निर्जीव उर्जास्त्रोतांपर्यंत सगळीकडे आपल्याला विज्ञान व विज्ञान प्रयोगांचे योगदान पाहायला मिळते.
कोणत्याही गोष्टीमध्ये 'शास्त्र असत ते' असे म्हणण्यात आले म्हणजे विज्ञान आलेच.साध्या भाषेत सांगायचे झाले तर रहस्यमयी आढळून येणाऱ्या गोष्टींची उकल करणे, उत्तर शोधणे म्हणजे विज्ञान.कामाचा वेग वाढविण्यासाठी विविध आविष्कार करणे म्हणजे विज्ञान .विज्ञानाचे 'To ease the life' हे उद्दिष्ट आहे म्हणावयास हरकत नाही. आपण रोज विविध प्रकारच्या किरणांशी संबंधात संबंधात येतो मग light waves असोत किंवा radio waves. radiography मधील Wifi किंवा microwaves.
आज विज्ञान दिनाचे अवचित्य साधून भारतातील प्रथम वायरलेस Communication चे जनक मानले जाणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांच्या योगदानाबद्दल माहिती सांगत आहे.
इटालियन शास्त्रज्ञ गुग्लिएल्मो मार्कोनी यांना परंपरेने रेडिओचा शोधक म्हणून श्रेय दिले जाते परंतु मार्कोनी यांनी वायरलेस सिग्नलिंगचे प्रयोग करण्यापूर्वी १८९५ मध्ये सर जगदीशचंद्र बोस यांनी रेडिओ लहरींचा वापर करून दादाविला. १८९६ मध्ये हा प्रयोग त्यांनी लंडनमध्येदेखील केला.
आपल्याला माहितच आहे की डॉ. जगदीशचंद्र बोस हे प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ हो
प्राण्यांप्रमाणे वनस्पतींनासुद्धा संवेदना, भावना असतात त्यांनी सिद्ध केले. सोलिड स्टेट फिजिक्स या संपूर्ण भौतिकशास्त्र शाखेची ओळख बोस यांनी करून दिली तसेच मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानाचा शोध लावला. जगातील सर्वात शक्तिशाली खगोलशास्त्रीय दुर्बिणी अजूनही बोस यांनी विकसित केलेल्या सिद्धांताचा वापर करतात. त्यांनी सत्येन बोस यांना कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शिकविले.
कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरीसाठी अर्ज केला तेव्हा भारतीय भौतिकशास्त्रज्ञ असू शकतो यावर इंग्रज अधिकाऱ्यांचा विश्वास बसत नव्हता. रागाच्या भरात त्याने पगार नाकारला. त्यामुळे त्यांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली. योग्य प्रयोगशाळा नाही. त्याला 24-स्क्वेअर-फुटांच्या छोट्या खोलीत (6 फूट बाय 4 फूट, कल्पना करा) सर्वकाही करावे लागले. एका सामान्य टिनस्मिथच्या मदतीने त्यांनी संशोधनासाठी उपकरणे तयार केली. एका प्रयोगशाळेच्या त्या धक्कादायक माफीनाम्यात, जवळजवळ निरक्षर कामगाराशिवाय इतर कोणाच्याही मदतीशिवाय, यूएस आणि युरोपमधील सर्वात सुसज्ज शास्त्रज्ञ जे करू शकले नाहीत ते त्यांनी साध्य केले.
खरच आपल्या देशात असे अनेक शोध आहेत ज्यांची प्रायोगिक प्रक्रिया होऊन सुद्धा ते काही कारणास्तव अलौकिक राहिले. त्यांचा योग्य असा गौरव झाला नाही. म्हणूनच आजच्या जगात प्रत्येकाने लौकिक शोधांसोबतच अलौकिक शोध व त्यांचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.
विज्ञान हे चिरकाल आहे व राष्ट्रीय प्रगतीचे एक मुख्य सुत्र आहे.
- वादसभा सदस्य
श्रावणी गोखले